Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

Saturday, 27 August 2016

                           मागे वळून पाहताना...
इंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल  सत्कार करताना मा.बी.राधाकृष्णन  (मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना


इंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल सत्कार करताना मा.राजेश टोपे (मा.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री,महाराष्ट्र. )

मा.नंदकुमार साहेब ( प्रधान शिक्षण सचिव ) यांच्या हस्ते सन्मानपत्र ...
मा.गोविंद नांदेडे साहेब ( शिक्षण संचालक,महाराष्ट्र ) यांच्या हस्ते सन्मानपत्र 
मा.सुसर साहेब ( शिक्षणाधिकारी,प्राथमिक) यांच्या हस्ते सन्मानपत्र ...
मा.श्रीम.धुपे मॅ डम ( गटशिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते सन्मानपत्र 


मा.दिपक चौधरी (मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना यांच्या हस्ते उपक्रमांच्या Android App चे उद्घाटन करताना..

शिक्षणाची वारी






मा.गटशिक्षणाधिकारी (पं.स.अंबड,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना..
मा.भिमराव डोंगरे(मा.शिक्षण सभापती,जि.प.जालना) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...
मा.अवधूत खडके (जिल्हापरिषद सदस्य, जि.प.जालना,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...
मा.प्रा.भागवत कटारे (प्रा.मस्योदरी शिक्षण संस्था) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...

Thursday, 26 November 2015

QR CODE विषयी



जग QR कोड चे

मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना?

म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?

QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?

सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.

https://www.the-qrcode-generator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/

QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?
Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.
       QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे -
1- विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.
2- एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.
3- एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ  क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.
4- मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.
   

Wednesday, 11 March 2015

संगणक व ई लार्निग कार्यशाळा

दिनांक ८ मार्च २०१५ रोजी मी (सचिन कडलग) व माझे सहकारी अंदुरे सर यांनी जालना जिल्हातील प्राथमिक शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हातील शिक्षकानी कार्यशाळेस चांगला प्रतिसाद दिला.  
     या कार्यशाळेत १)शैक्षणिक वेबसाईट(ब्लाॅग्ज) तयार करणे २)शैक्षणिक video तयार करणे ३)पीपीटी तयार करणे ४)फोटोशाॅप बेसिक ५)you tube चा वापर ६)आॅनलाईन टेस्ट ७)आॅनलाईन टपाल ८)गुगल मराठी ९)गुगल community १०)कमीत कमी खर्चात शाळा E learning कशा कराव्यात.व त्याचे फायदे,तोटे.११)याशिवाय २५ ते ३० educational software ची माहिती देण्यात आली.
शिक्षकाच्या कार्यशाळेतील निवडक प्रतिक्रिया........